
RBI Payout: सरकारला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून विक्रमी लाभांश मिळण्याची अपेक्षा आहे. अर्थतज्ज्ञांचा असा विश्वास आहे की आरबीआय या वर्षी सरकारला 3.5 लाख कोटी रुपयांपर्यंत (41.4 अब्ज डॉलर्स) लाभांश देऊ शकतो. हा लाभांश पाकिस्तानच्या आयएमएफ कर्जापेक्षा अनेक पट जास्त आहे. पाकिस्तानने अलीकडेच आयएमएफकडून 1.4 अब्ज डॉलर्स (सुमारे 12 हजार कोटी रुपये) कर्ज घेतले आहे. IMFच्या अटी पूर्ण केल्यानंतर पाकिस्तानला हे कर्ज मिळाले आहे.