
EMI Debt Trap: आज मोबाईलवर बँकिंगपासून ते शॉपिंगपर्यंत सगळ्या काही सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे घर, इलेक्ट्रॉनिक्स, प्रवास किंवा हॉस्पिटलमधील खर्च सगळं काही 'ईएमआय' म्हणजेच हप्त्यांमध्ये देण्याची सवय वाढली आहे. पण हीच सवय आता भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी मोठं आर्थिक संकट बनतेय.