Google Layoffs: गुगलच्या कर्मचारी कपातीबाबत सुंदर पिचाई यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, कंपनी सध्या...

2022 पासून सुरू झालेली टेक कंपन्यांची कर्मचारी कपात 2023 मध्येही सुरू आहे.
Google Layoffs
Google LayoffsSakal

Google Layoffs: 2022 पासून सुरू झालेली टेक कंपन्यांची कर्मचारी कपात वर्ष 2023 मध्येही सुरू आहे. मेटा, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन, ट्विटर यासारख्या अनेक कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर कर्माच्री कपात केली आहे.

याचा फटका जगभरातील कर्मचाऱ्यांना बसला आहे. या यादीत दिग्गज टेक कंपनी Google चे नाव देखील समाविष्ट आहे. Amazon आणि Meta च्या पावलावर पाऊल ठेवत, Google देखील लवकरच मोठ्या प्रमाणावर कर्मचार्‍यांची कपात करू शकते.

Google पुन्हा एकदा कर्मचारी कपात करू शकते का? या प्रश्नाचे उत्तर देताना वॉल स्ट्रीट जर्नलशी बोलताना गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई म्हणाले की, कंपनी सध्या आपल्या कामकाजावर खूप लक्ष केंद्रित करत आहे.

कंपनीच्या वाढीसाठी बरेच काम करणे बाकी आहे. महत्त्वाची कामे आम्ही प्राधान्याने पाहू आणि त्यानुसार लोकांची निवड करू, असे ते म्हणाले.

वॉल स्ट्रीट जर्नलशी बोलताना सुंदर पिचाई यांनी सूचित केले की, येत्या काळात गुगल आणखी कर्मचाऱ्यांची कपात करू शकते (Google to layoffs more Employees). त्यांनी स्पष्ट केले की त्यांना गुगल 20 टक्के अधिक कार्यक्षम बनवायचे आहे.

अशा परिस्थितीत आम्ही दररोज आमचे काम अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करत असतो. यासोबतच सुंदर पिचाई म्हणाले की, कंपनी आपल्या खर्चाची आणि कमाईची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न करत आहे.

Google Layoffs
Keshub Mahindra Passes Away : भारतातील सर्वात वृद्ध अब्जाधीश केशब महिंद्रा यांचे 99 व्या वर्षी निधन

गुगलचे लक्ष AI वर आहे :

गुगल एआय सेंट्रल प्रोग्रामवरही लक्ष केंद्रित करत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बोलताना ते म्हणाले की, आम्ही सतत एआय (Google AI) वर काम करत आहोत. आम्ही आमच्या महत्त्वाच्या कामांसाठी AI वापरण्याचा प्रयत्न करत आहोत.

मात्र या क्षेत्रात अजून बरेच काम करायचे आहे. पुढील टप्प्यात कंपनी किती कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे याची माहिती पिचाई यांनी स्पष्टपणे दिली नाही, मात्र कर्मचारी कपातीचे संकेत मात्र दिले आहेत.

गुगल आपला खर्च कमी करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून एक योजना तयार करत आहे. अशा परिस्थितीत येत्या काळात आणखी कर्मचारी कपात होऊ शकते.

Google Layoffs
सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com