
Mother Dairy Cuts Milk Prices by Rs 2 Per Litre After GST Revision
Esakal
केंद्र सरकारने जीएसटी स्लॅबमध्ये बदल केल्यानं सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दैनंदिन वापरातल्या वस्तूंपासून ते महागड्या गाड्यांपर्यंत अनेक गोष्टींचे दर यामुळे कमी होणार आहेत. आता मदर डेअरीने जीएसटी स्लॅबमध्ये बदलानंतर मोठा निर्णय़ घेतला आहे. दूध, तूप आणि लोण्याच्या दरात कपात केली आहे. मदर डेअरीने टेट्रा पॅक दुधाच्या दरात प्रतीलीटर २ रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.