Asia's Richest Person: अंबानी पुन्हा बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अदानींची 'या' स्थानावर घसरण

गेल्या वर्षी मुकेश अंबानी फोर्ब्सच्या या प्रसिद्ध अब्जाधीशांच्या यादीत 10 व्या स्थानावर होते
Mukesh Ambani Asia's Richest Person
Mukesh Ambani Asia's Richest PersonSakal

Asia's Richest Person: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गौतम अदानींनी मुकेश अंबानींना मागे टाकले होते.

मात्र पुन्हा एकदा मुकेश अंबानींनी या स्थानावर विराजमान झाले आहेत. मुकेश अंबानी यांनी फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादी 2023 मध्ये 9 वे स्थान मिळवले आहे आणि ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही आहेत.

मुकेश अंबानींची मालमत्ता किती आहे?

65 वर्षीय मुकेश अंबानी 83.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत 9व्या स्थानावर आले आहेत. (Mukesh Ambani regains Asia's richest person spot Forbes Report)

अशा प्रकारे त्यांनी पुन्हा एकदा टॉप 10 मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. या यादीत LVMH चे बर्नार्ड अर्नॉल्ट पहिले आले असून त्यांची एकूण संपत्ती 211 अब्ज डॉलर आहे.

गेल्या वर्षी मुकेश अंबानी दहाव्या क्रमांकावर होते :

गेल्या वर्षी, मुकेश अंबानी फोर्ब्सच्या या प्रसिद्ध अब्जाधीशांच्या यादीत 10 व्या स्थानावर होते आणि त्यांची एकूण संपत्ती 90.7 अब्ज डॉलर होती.

यंदाच्या यादीत मुकेश अंबानी मायक्रोसॉफ्टचे स्टीव्ह बाल्मर, गुगलचे लॅरी पेज आणि सर्जे ब्रिन यांच्या पुढे आहेत. एवढेच नाही तर फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग आणि डेल टेक्नॉलॉजीचे मायकेल डेल यांच्याही पुढे आहेत.

गौतम अदानी यांचे मोठे नुकसान :

अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली असून फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत ते 24 व्या स्थानावर आले आहेत. हिंडेनबर्ग संशोधन अहवाल समोर आल्यापासून अदानी समूहाच्या संपत्तीत घसरण झाल्यामुळे गौतम अदानी फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत 24 व्या स्थानावर घसरले आहेत.

24 जानेवारी रोजी, गौतम अदानी हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते आणि त्यांची एकूण संपत्ती 126 अब्ज डॉलर होती. 24 मार्च रोजी अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने आपला अहवाल समोर आणला आणि तेव्हापासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण सुरू झाली.

Mukesh Ambani Asia's Richest Person
GDP Rate : भारताबाबतच्या विकासदराच्या अंदाजात जागतिक बँकेकडून कपात

HCL टेकचे शिव नाडर यांचेही नाव या यादीत :

गौतम अदानी हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती राहिले आहेत. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत नुकत्याच झालेल्या घसरणीनंतर, ते 47.2 अब्ज डॉलरच्या एकूण मालमत्तेसह जागतिक यादीत 24व्या स्थानावर आले आहेत.

एचसीएल टेक्नॉलॉजीजचे शिव नाडर या यादीत भारतीयांमध्ये तिसरे असून त्यांची संपत्ती 25.6 अब्ज डॉलर्स आणि जागतिक यादीत 55व्या क्रमांकावर आहे.

भारतात अब्जाधीशांची संख्या वाढली :

फोर्ब्सच्या अब्जाधीशांची जागतिक क्रमवारी गेल्या वर्षीच्या 2,668 वरून 2023 मध्ये 2,640 वर घसरली आहे, जरी भारतातील अब्जाधीशांची संख्या 2022 मध्ये 166 वरून यावर्षी (2023) 169 पर्यंत वाढली आहे.

Mukesh Ambani Asia's Richest Person
सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Cureency करकक्षेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com