Reliance Shares: दिवाळीपूर्वीच पैशांचा पाऊस...! एकाच दिवसात कमावले ७९,७०० कोटी रुपये; अदानी अजूनही पुढे

Mukesh Ambani's Net Worth Increases by ₹79,700 Crore in One Day : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये विक्रमी तेजी आल्याने मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत ७९,७०० कोटी रुपयांची वाढ झाली. अदानी अजूनही आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
Mukesh Ambani's wealth rises by ₹79,700 crore in a single day following a 12% surge in Reliance Industries shares

Mukesh Ambani's wealth rises by ₹79,700 crore in a single day following a 12% surge in Reliance Industries shares

esakal

Updated on: 

दिवाळीपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये झालेल्या विक्रमी तेजीमुळे अंबानी यांच्या संपत्तीत अवघ्या एका दिवसात तब्बल ७९ हजार ७०० कोटी रुपयांची भर पडली. त्यामुळे त्यांची एकूण संपत्ती आता ८५.७ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ८.१३ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकातही त्यांनी मोठी झेप घेत २३ वे स्थान मिळवले आहे. मात्र, आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती होण्याच्या शर्यतीत ते अद्याप गौतम अदानी यांच्या मागे आहेत. दिलेल्या माहितीनुसार, एका डॉलरचा विनिमय दर ९४.९४ रुपये आहे.

Loading content, please wait...