

Mumbai Property
esakal
मुंबईत घरखरेदीचा कल प्रचंड वाढला आहे. नोव्हेंबर महिन्यात मालमत्ता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क संकलनाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. महाराष्ट्राच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर २०२५ मध्ये मुंबईत एकूण १२,२१९ मालमत्तांची नोंदणी झाली. हा आकडा मागील वर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत २० टक्क्यांनी जास्त आहे. यातून राज्य सरकारला मुद्रांक शुल्कापोटी १,०३८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला, जो गेल्या वर्षीपेक्षा १२ टक्के अधिक आहे. ऑक्टोबर २०२५ च्या तुलनेत नोंदणीमध्ये पाच टक्के वाढ झाली, तर महसूल जवळपास स्थिर राहिला.