Mutual Fund SIP: तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही SIP थांबवू शकता का? असा होऊ शकतो परिणाम

Mutual Fund SIP: SIP मध्येच थांबवण्याचा पर्याय आहे का?
Mutual Fund SIP What happens when you miss a monthly contribution
Mutual Fund SIP What happens when you miss a monthly contribution Sakal

: शिवानी शेळके

Mutual Fund SIP: बचतीच्या दृष्टिकोनातून SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन हा एक चांगला पर्याय मानला जातो. म्युच्युअल फंडात बचत करण्याचा हा पर्याय अलीकडे उदयास आला आहे. लोकांना कमी वेळेत जास्त पैसे कमवण्याचा हा पर्याय फक्त म्युच्युअल फंडात मिळतो.

यामध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे. त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. SIP मधील गुंतवणुकीचा थेट परिणाम शेअर बाजारावर होतो. अशा स्थितीत बाजारामध्ये थोडासा चढउतार झाला तरी त्याचा थेट परिणाम SIPच्या परताव्यावर होतो.

(Mutual Fund SIP What happens when you miss a monthly contribution)

SIPचा हप्ता दरमहा तुमच्या खात्यातून डेबिट केला जातो. म्हणून SIPचा हप्ता ज्या तारखेला असेल त्यावेळी तुमच्या खात्यात पैसे असले पाहिजेत. देय तारखेला, स्टॉक ब्रोकर पेमेंट रिक्वेस्ट पाठवतो, जर खात्यात पैसे नसतील तर पेमेंट करता येत नाही. अशा परिस्थितीत, पेमेंट डिफॉल्टसाठी बँक तुमच्याकडून दंड आकारण्याची शक्यता आहे.

तुमचा SIP हप्ता सलग 4 महिने चुकल्यास, तुमची SIP बंद होऊ शकते. पूर्वी हा नियम 3 महिन्यांसाठी होता मात्र आता हा नियम 4 महिन्यांसाठी करण्यात आला आहे.

SIP बंद होणे म्हणजे तुम्ही त्या SIP मध्ये पैसे गुंतवू शकणार नाही. तुम्ही जमा केलेली रक्कम (मॅच्युअर)  परिपक्व झाल्यानंतर तुम्ही पैसे काढू शकता. सुरुवातीच्या तुलनेत तुम्हाला कमी परतावा मिळण्याची शक्यता आहे.

SIP मध्येच थांबवण्याचा पर्याय आहे का?

SIP मध्ये ब्लॉक करण्याचा पर्याय देखील आहे. जेव्हा शेअर बाजार खाली येतो तेव्हा SIP थांबवणे चांगले. अन्यथा, बाजारातील चढउतारांचा तुमच्या परताव्यावर परिणाम होऊ शकतो. आणि इच्छा नसतानाही तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते.

शेअर बाजार घसरल्‍यावर एसआयपी थांबवणे हा एक अतिशय शहाणपणाचा निर्णय आहे. जेव्हा बाजार खाली येतो तेव्हा तुम्ही नुकसान होण्यापासून वाचता. तसेच, जेव्हा बाजार खाली आल्यानंतर पुन्हा वाढतो तेव्हा गुंतवणूकदारांनी त्यांची गुंतवणूक चालू ठेवल्यास अधिक फायदे मिळतात.

Mutual Fund SIP What happens when you miss a monthly contribution
TCS Job Scam: TCS नोकर भरती घोटाळा प्रकरणी कंपनीची मोठी कारवाई, 16 कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

SIP कधी थांबवता येईल?

जेव्हा जेव्हा शेअर बाजारात घसरण होते तेव्हा तुम्ही ती थांबवू शकता. तसेच, जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमच्याकडे पुरेसे पैसे नाहीत आणि तुम्हाला पैशांची गरज आहे, तेव्हा तुम्ही SIP थांबवू शकता. काही काळासाठी एसआयपी थांबवल्याने तुमच्या परताव्यावर परिणाम होत नाही. SIP पूर्णपणे थांबवणे हा योग्य निर्णय नाही.

Mutual Fund SIP What happens when you miss a monthly contribution
LinkedIn Layoff: लिंक्डइनचा कर्मचाऱ्यांना मोठा धक्का! वर्षभरात दुसऱ्यांदा करणार कर्मचारी कपात

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com