LinkedIn Layoff: लिंक्डइनचा कर्मचाऱ्यांना मोठा धक्का! वर्षभरात दुसऱ्यांदा करणार कर्मचारी कपात

LinkedIn Layoff: लिंक्डइनने आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची या वर्षातील ही दुसरी वेळ आहे.
LinkedIn to layoff 668 employees across engineering, product and other departments amid slow revenue growth
LinkedIn to layoff 668 employees across engineering, product and other departments amid slow revenue growth Sakal

LinkedIn Layoff: जगभरातील टेक कंपन्यांमधील कर्मचारी कपातीचा टप्पा अद्याप संपलेला नाही. गेल्या काही महिन्यांत गुगल आणि ट्विटरसह अनेक कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. आता या यादीत मायक्रोसॉफ्टच्या मालकीची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंपनी लिंक्डइन या कंपनीचाही समावेश झाला आहे.

कंपनीने सोमवारी एका निवेदनात सांगितले की, एकूण 668 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येणार आहे. यामध्ये इंजिनीअरिंग, टॅलेंट आणि फायनान्स टीममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

लिंक्डइनने आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची या वर्षातील ही दुसरी वेळ आहे. कंपनीत एकूण 20,000 कर्मचारी आहेत आणि 3% पेक्षा जास्त कर्मचारी या कपातीमुळे प्रभावित होणार आहेत.

या वर्षी मे महिन्यात 716 हून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकल्यानंतर, LinkedIn आता आणखी 668 कर्मचार्‍यांना कामावरून काढणार आहे. हे वर्ष केवळ लिंक्डइनसाठीच नाही तर संपूर्ण तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी खूप वाईट गेले आहे. तंत्रज्ञान कंपन्यांनी यावर्षी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

LinkedIn to layoff 668 employees across engineering, product and other departments amid slow revenue growth
Real Estate: सणासुदीच्या काळात घरांच्या मागणीत वाढ; गेल्या नऊ महिन्यांत पुण्यात 1,07,445 घरांची विक्री

एम्प्लॉयमेंट फर्म "चॅलेंजर ग्रे अँड ख्रिसमस" च्या अहवालानुसार, या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत तंत्रज्ञान क्षेत्रातील सुमारे 1,41,516 कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमावली आहे.

लिंक्डइनचा मुख्य महसूल जाहिरातींमधून येतो. LinkedIn च्या महसुलात मागील तिमाहीत 10% वाढीच्या तुलनेत वार्षिक 5% वाढ झाली. मायक्रोसॉफ्टने सांगितले की लिंक्डइनच्या जाहिरातीच्या खर्चात घट झाल्याचा फटका कंपनीला बसला आहे.

LinkedIn to layoff 668 employees across engineering, product and other departments amid slow revenue growth
Share Market Today: आज इंट्राडेमध्ये कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? तज्ञांनी सुचवले 10 शेअर्स

दरम्यानच्या काळात प्लॅटफॉर्मवर नवीन वापरकर्त्यांची संख्या वाढली आहे आणि प्लॅटफॉर्मचे एकूण वापरकर्ते सुमारे 95 कोटींवर पोहोचले आहेत. अमेरिका आणि युरोपमध्ये मंदीच्या भीतीमुळे टेक कंपन्यांनी या वर्षी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com