

Navratri Vehicle Sales Decline 6.52% in India
esakal
Navratri Vehicle Sales Decline 6.52% in India : नवरात्रीच्या सणादरम्यान देशातील वाहन बाजारात संमिश्र चित्र पाहायला मिळाले आहे.अवघ्या १० दिवसांत देशभरात ११.२३ लाख वाहनांची नोंदणी झाली. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण वाहन विक्रीत ६.५२ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दुचाकी, व्यावसायिक वाहने आणि ट्रॅक्टरच्या विक्रीत तुलनेने स्थिरता दिसून आली असताना, कारच्या विक्रीत मोठी घसरण झाली आहे. दुसरीकडे, इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा