Nestle Baby Products: नेस्ले कंपनी सरकारच्या रडारवर; अहवालात मोठा खुलासा, बेबी फूडमध्ये मिसळली साखर

Nestle Baby Products: नेस्ले कंपनी भारत सरकारच्या रडारवर आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या बेबी फूडमध्ये साखर मिसळल्याच्या अहवालाची चौकशी करण्याची मागणी सरकारने केली आहे. नेस्ले भारतात विकल्या जाणाऱ्या बेबी फूडमध्ये साखर मिसळत असल्याचे स्विस तपास संस्थेच्या पब्लिक आयच्या अहवालातून समोर आले आहे
Nestle adds sugar to baby food only in poor nations' not in UK & Europe report
Nestle adds sugar to baby food only in poor nations' not in UK & Europe report Sakal

Nestle Baby Products: नेस्ले कंपनी भारत सरकारच्या रडारवर आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या बेबी फूडमध्ये साखर मिसळल्याच्या अहवालाची चौकशी करण्याची मागणी सरकारने केली आहे. नेस्ले भारतात विकल्या जाणाऱ्या बेबी फूडमध्ये साखर मिसळत असल्याचे स्विस तपास संस्थेच्या पब्लिक आयच्या अहवालातून समोर आले आहे, त्यानंतर ही कंपनी सरकारच्या निशाण्यावर आली आहे.

अमेरिका आणि युरोपमध्ये बेबी फूडमध्ये अतिरिक्त साखर घालण्यावर बंदी आहे. त्यात कोणत्याही कंपनीने साखर टाकल्यास मोठा दंड आकारला जातो. परंतु आशियाई देशांमध्ये बाळाच्या आहारात साखर घालण्यासाठी कोणताही दंड नाही. अशा परिस्थितीत नेस्ले बेबी फूडमध्ये साखर घालत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

Nestle adds sugar to baby food only in poor nations' not in UK & Europe report
Anant Ambani: दानशूर अनंत अंबानी! रामनवमीला 'या' दोन मंदिरांना दान केले 5,00,00,000 रुपये

WHO ची मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत?

जर हा अहवाल खरा असल्याचे आढळून आले तर ते जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) निर्देशांचे उल्लंघन आहे. डब्ल्यूएचओच्या मते, 3 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या जेवणात साखर किंवा गोड पदार्थ वापरू नयेत.

साखर घातल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. शरीरात खराब कोलेस्टेरॉल, मधुमेह, अल्झायमरचा धोका, दातांमधील पोकळीची समस्या, मानसिक आरोग्य, पांढऱ्या रक्तपेशी कमकुवत होणे, प्रतिकारशक्ती कमी होणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात.

Nestle adds sugar to baby food only in poor nations' not in UK & Europe report
Stock Market: मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास कोणते शेअर्स करतील मालामाल? ब्रोकरेजने वर्तवला अंदाज

नेस्लेचे काय म्हणणे आहे?

नेस्ले इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनीने गेल्या पाच वर्षांत आपल्या बेबी फूडमधील साखरेचे प्रमाण 30 टक्क्यांनी कमी केले आहे. कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे की, गुणवत्ता, सुरक्षितता आणि चव यांच्याशी तडजोड न करता साखरेची पातळी कमी करण्यासाठी आम्ही नियमितपणे आमच्या अन्नाची चाचणी करतो आणि आमच्या उत्पादनांमध्ये सुधारणा करतो.

भारतात विकल्या जाणाऱ्या नेस्लेच्या बेबी फूड उत्पादनांमध्ये साखरेचे प्रमाण किती?

अहवालानुसार, भारतात विकल्या जाणाऱ्या नेस्लेच्या मुलांच्या उत्पादनांच्या प्रत्येक सर्व्हिंगमध्ये सुमारे 3 ग्रॅम साखर आढळून आली. या साखरेच्या पाकिटावर कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

गरीब आणि विकसनशील देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये नेस्लेचा साखरेचा वापर उघडकीस आला. जेव्हा स्विस तपास संस्था पब्लिक आय आणि IBFAN (इंटरनॅशनल बेबी फूड ॲक्शन नेटवर्क) ने आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या कंपनीच्या बेबी फूडची तपासणी केली.

बुधवारी सार्वजनिक केलेल्या पब्लिक आय तपासणी अहवालात असे म्हटले आहे की नेस्लेने जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये विकल्या गेलेल्या बेबी फूडमध्ये साखर आढळली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com