Tata group: 32 वर्षांच्या टाटाची धमाकेदार एंट्री! स्टार कंपनीचे करणार नेतृत्व, रतन टाटांचा होणार वारसदार?

Neville Tata Star Bazaar: टाटा समूहाच्या नव्या पिढीने कंपनीचे नेतृत्व स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. 32 वर्षीय नेव्हिल टाटा यांनी स्टार बाजारचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. स्टार बाजार हे ट्रेंट लिमिटेडचे ​​हायपरमार्केट युनिट आहे.
Neville Tata Star Bazaar
Neville Tata Star BazaarSakal
Updated on

Neville Tata Star Bazaar: टाटा समूहाच्या नव्या पिढीने कंपनीचे नेतृत्व स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. 32 वर्षीय नेव्हिल टाटा यांनी स्टार बाजारचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. स्टार बाजार हे ट्रेंट लिमिटेडचे ​​हायपरमार्केट युनिट आहे, जो टाटा समूहाच्या रिटेल व्यवसायाचा भाग आहे.

नेव्हिल टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आणि ट्रेंट लिमिटेडचे ​​अध्यक्ष नोएल टाटा यांचा मुलगा आहे. रतन टाटा हे टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत, जी समूहाची होल्डिंग कंपनी आहे. नेव्हिल ट्रेंट हायपरमार्केटच्या बोर्डावर बाह्य संचालक होते. नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे.

रिपोर्ट्सनुसार, नेव्हिल काही वर्षांपूर्वी हायपरमार्केट व्यवसायाची जबाबदारी सांभाळत होते आणि नंतर ते पुढील शिक्षणासाठी परदेशात गेले. ट्रेंटकडे वेस्टसाइड, झूडिओ आणि झारा सारखे ब्रँड आहेत.

Bayes Business Schoolचे माजी विद्यार्थी असलेले नेव्हिल 2016 मध्ये Trent Limited मध्ये सामील झाले आणि कंपनीची कमान हाती घेतली. त्यानंतर, त्यांनी Zoodio चे व्यवस्थापन केले, जे आज देशातील अग्रगण्य ब्रँडपैकी एक आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेव्हिलला या व्यवसायाची जबाबदारी घेताना नोएल टाटा यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. नंतर, ते हायपरमार्केटचे सीईओ किंवा कार्यकारी संचालक होऊ शकतात.

नोएल टाटा यांच्या मुली टाटा समूहात सक्रिय आहेत

नोएल टाटा यांच्या मुली लेह टाटा आणि माया टाटा टाटा समूहाच्या कंपन्यांमध्ये काम करत आहेत. 39 वर्षीय लेह टाटा यांना अलीकडेच इंडियन हॉटेल्सच्या गेटवे ब्रँडची जबाबदारी देण्यात आली आहे. माया टाटा यांना तंत्रज्ञान क्षेत्रात रस आहे. त्या सध्या टाटा डिजिटलमध्ये काम करतात.

सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टशी संबंधित ट्रस्टचे विश्वस्त म्हणून लेह, माया आणि नेव्हिल यांचाही समावेश करण्यात आला आहे. नोएल टाटा, जे व्होल्टासचे अध्यक्ष आहेत, ते टाटा ट्रस्टचे विश्वस्त देखील आहेत, ज्यांचा टाटा सन्समध्ये 66% हिस्सा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com