
New GST Rates Updates
Sakal
नवीन GST 2.0 धोरणामुळे 4 स्लॅब कमी करून फक्त 5% आणि 18% स्लॅब ठेवले आहेत.
दैनंदिन वस्तू, कपडे, हवाई प्रवास, औषधे आणि रेस्टॉरंट बिलावर मोठी कर सवलत मिळणार आहे.
यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबाला दरवर्षी अंदाजे 42,380 रुपयांची बचत होईल.
New GST Rates Updates: केंद्र सरकारने दिवाळीपूर्वीच सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. बजेटमध्ये इन्कम टॅक्समध्ये सूट दिल्यानंतर आता सरकारने जीएसटीच्या स्लॅबमध्ये मोठा बदल केला आहे. आतापर्यंत 5%, 12%, 18% आणि 28% असे चार वेगवेगळे जीएसटी स्लॅब होते. आता हे कमी करून फक्त दोन मुख्य स्लॅब – 5% आणि 18% – ठेवले आहेत. याशिवाय 40% चा एक विशेष स्लॅब ठरवण्यात आला आहे, ज्यात सिगारेट, गुटखा, तंबाखू, पान मसाला, महागडे दारूचे प्रकार आणि इतर सिन गुड्स व लग्जरी वस्तूंचा समावेश आहे.