ITR New Rule : आयटीआर फॉर्ममध्ये नवीन बदल; आता कॅश पेमेंट अन् बँक खात्यांबाबत द्यावी लागणार सर्व माहिती

यावर्षी चालू वित्त वर्ष संपण्याच्या तीन महिन्यांपूर्वीच आयटीआर फॉर्म उपलब्ध करण्यात आले आहेत.
ITR New Rule
ITR New RuleeSakal

New ITR Forms : आयटीआर भरण्याच्या नव्या सीझनची अधिकृत सुरुवात झाली आहे. यावर्षी चालू वित्त वर्ष संपण्याच्या तीन महिन्यांपूर्वीच आयटीआर फॉर्म उपलब्ध करण्यात आले आहेत. यावर्षी आयटीआर फॉर्ममध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यामुळे करदात्यांना कॅश पेमेंट आणि बँकिंगबाबत अतिरिक्त माहिती द्यावी लागणार आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) शुक्रवारी उशीरा आर्थिक वर्ष 2023-24 (असेसमेंट इयर 2024-25) साठी आयटीआर-1 आणि आयटीआर-4 फॉर्म जारी केले होते. यापूर्वी हे फॉर्म साधारणपणे फेब्रुवारी-मार्च या महिन्यांमध्ये उपलब्ध करून दिले जात होते. मात्र, यावेळी तीन महिन्यांपूर्वीच हे फॉर्म जारी करण्यात आले आहेत. ITR भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे.

यावर्षी काय झाले बदल?

इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार यावर्षी ITR-1 आणि ITR-2 या दोन्ही फॉर्ममध्ये काही बदल करण्यात आले आहेत. ITR-1 मध्ये आता करदात्यांना या आर्थिक वर्षात सक्रिय असणाऱ्या सर्व बँक खात्यांची माहिती द्यावी लागणार आहे. या सर्व खात्यांचा प्रकार देखील स्पष्ट करावा लागणार आहे. तसंच या फॉर्ममध्ये अग्निवीर म्हणून काम करत असणाऱ्या तरुणांसाठी सेक्शन 80 सीसीएच अंतर्गत होणाऱ्या कपातीसाठी वेगळा सेक्शन दिला आहे.

ITR New Rule
ITR Filing: आयटीआर फाइलिंगचा नवा विक्रम, 31 ऑक्टोबरपर्यंत भरले 7.85 कोटी रिटर्न

ITR-4 मध्ये झालेल्या बदलानुसार, करदात्यांना या आर्थिक वर्षामध्ये कुठू-कुठून कॅशमध्ये पैसे मिळाले याची माहिती देखील द्यावी लागणार आहे. यासाठी या फॉर्ममध्ये नवीन कॉलम जोडण्यात आला आहे. यात करदाते आपल्याला मिळालेल्या रकमेची पूर्ण माहिती देऊ शकतील.

कोणता फॉर्म कुणासाठी?

ज्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, आणि तिला पगार, घर/दुकान भाडं, अन्य स्त्रोतांमधून मिळणारं व्याज आणि 5 हजार रुपयांपर्यंत कृषी उत्पन्न मिळत असेल; अशी व्यक्ती आयटीआर-1 हा फॉर्म भरू शकते.

इंडिव्हुजुअल करदाता, अविभाजित हिंदू परिवार आणि एलएलपी यांव्यतिरिक्त इतर लोक, ज्यांची एकूण कमाई 50 लाख रुपयांपर्यंत आहे आणि कमाईचं साधन बिझनेस किंवा नोकरी आहे असे लोक आयटीआर-4 हा फॉर्म भरू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com