

New Labour Law- Unused Leaves Turn Into Cash – Big Win for Employees
eSakal
New Labour Law Leave Encashment: नवीन कामगार कायद्यामुळे आता कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांमध्ये मोठा फायदा होणार आहे. तुम्ही ज्या कंपनी किंवा संस्थेमध्ये नोकरी करता तिथे कर्मचाऱ्यांना वर्षभरात किती सुट्ट्या मिळणार याची माहिती दिली जाते. मात्र प्रत्यक्षात कामाचा ताण इतका असतो की अनेकांना त्या सर्व सुट्ट्या वापरता येत नाहीत. परिणामी, न वापरलेल्या सुट्ट्या वाया जातात. पण आता परिस्थिती बदलणार आहे. केंद्र सरकारने नव्या लेबर कोड अंतर्गत सुट्ट्यांच्या वार्षिक रोखीकरण सुविधा (Leave Encashment) नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.