

SEBI MF Companies: सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (SIP) म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी SEBIने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला एसआयपी बंद करण्यासाठी 10 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार नाही. नवीन नियमानुसार, आता फक्त दोन दिवसांत तुमच्या विनंतीवर SIP बंद होईल. SEBIने म्युच्युअल फंड कंपन्यांसाठी नवीन नियम अनिवार्य केला आहे आणि तो 1 डिसेंबर 2024 पासून लागू करण्यात आला आहे.