New Tariff Order : स्टार, सोनी, झी चॅनेल झाले बंद, 4.5 कोटी वापरकर्त्यांना धक्का, काय आहे कारण?

ऑल इंडिया डिजिटल केबल फेडरेशन कायदेशीर मार्ग काढण्याचा विचार करत आहे.
New Tariff Order
New Tariff Ordersakal

New Tariff Order : भारतातील तीन सर्वात मोठ्या मीडिया कंपन्या, स्टार, सोनी आणि झी, नवीन टॅरिफ ऑर्डर 3.0 (NTO 3.0) च्या अंमलबजावणीमुळे केबल प्लॅटफॉर्मवर बंद झाल्या आहेत.

डिजिटल केबल टेलिव्हिजन कंपन्यांची सर्वोच्च संस्था ऑल इंडिया डिजिटल केबल फेडरेशन (AIDCF) ने सांगितले की, त्यांनी करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे.

कारण यामुळे खर्च 25 टक्क्यांवरून 35 टक्क्यांपर्यंत वाढेल आणि वापरकर्त्यांना अतिरिक्त पैसे मोजावे लागतील जातील. AIDCF यावर कायदेशीर मार्ग काढण्याचा विचार करत आहे.

45 दशलक्ष वापरकर्ते प्रभावित :

15 फेब्रुवारी रोजी, प्रसारकांनी केबल ऑपरेटर/मल्टी सिस्टम ऑपरेटरना प्रादेशिक नियामक TRAI द्वारे जारी केलेल्या नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO) 3.0 साठी इंटरकनेक्ट ऑफर (RIO) वर स्वाक्षरी करण्यासाठी नोटिस जारी केल्या होत्या.

मात्र, केबल सेवा चालकांनी याकडे लक्ष न दिल्याने वितरकांनी चॅनेल बंद केले आहेत. या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांच्या मते, या निर्णयामुळे केबल टीव्ही ऑपरेटरच्या सुमारे 45 दशलक्ष वापरकर्त्यांवर परिणाम होण्याची अपेक्षा आहे.

फेब्रुवारीमध्ये लागू झालेल्या NTO 3.0 अंतर्गत, लोकप्रिय चॅनेलच्या किंमती 15 टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत.

New Tariff Order
Share Market : 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या घसरणीची शक्यता; बाजार तज्ञांचा अंदाज

निवेदन जारी करून TRAI ने नवीन NTO मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्यानंतर 4 वर्षांनी ब्रॉडकास्टरने किंमत वाढवली आहे. बहुतेक डीटीएच आणि केबल ऑपरेटर्सनी नवीन किंमतींची अंमलबजावणी सुरू केली आहे.

80% केबल ऑपरेटर NTO चे अनुसरण करत आहेत :

ब्रॉडकास्टर्सचा दावा आहे की, डीटीएच (डायरेक्ट-टू-होम) ऑपरेटर जसे डिश टीव्ही, टाटा प्ले आणि सुमारे 80% केबल ऑपरेटर्सनी नवीन टॅरिफ ऑर्डरचे पालन केले आहे.

हॅथवे केबल आणि डेन नेटवर्क या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीच्या केबल टीव्ही वितरण कंपन्यांसह ऑल इंडिया डिजिटल केबल फेडरेशन (AIDCF) चे बहुतेक सदस्य आदेशाचे पालन करत नाहीत.

New Tariff Order
स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

दरम्यान, दर्शकांना काही पर्याय शिल्लक राहिले आहेत. काहींनी DTH आणि स्ट्रीमिंग सेवा जसे की Netflix आणि Amazon प्राइम व्हिडिओकडे वळले आहे, तर काहींनी अवैध स्ट्रीमिंग साइट्सचा अवलंब केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com