Share Market : 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या घसरणीची शक्यता; बाजार तज्ञांचा अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Tips

Share Market : 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या घसरणीची शक्यता; बाजार तज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips : रॅडिको खेतानचे (Radico Khaitan) शेअर्स दिवसेंदिवस चांगली कामगिरी करत आहेत. नुकतेच बीएसईवर रॅडिकोचे शेअर्स 1.96 टक्क्यांनी वाढून 1123.55 रुपयांवर बंद झाले. या शेअर्सने लाँग टर्ममध्ये गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

पण डिसेंबर 2022 तिमाहीच्या कमकुवत निकालांमुळे, बाजार तज्ज्ञांनी याचे शेअर्स सुमारे 20 टक्क्यांनी घसरतील असा अंदाज वर्तवला आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने त्याचे टारगेट 900 रुपये निश्चित केले आहे.

कंपनीचे मार्केट कॅप 15,018.92 कोटी आहे. कंपनी 8PM व्हिस्की, मॅजिक मोमेंट्स वर्व वोडका आणि व्हाईटहॉल व्हिस्कीसारखे प्रॉडक्ट्स विकते.

रॅडिको खेतानचे शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहेत. 20 जून 2003 रोजी केवळ 7.78 रुपयांना मिळत होते, जे आता 1123.55 रुपयांपर्यंत गेलेत. म्हणजेच 20 वर्षांपेक्षा कमी कालावधीत, केवळ 70,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर त्यांनी गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

गेल्या वर्षी 12 मे 2022 रोजी त्याची किंमत 731.35 रुपये होती, जी एका वर्षातील विक्रमी नीचांकी आहे. यानंतर शेअर्सची खरेदी वाढली, त्यानंतर अवघ्या 9 महिन्यांत ती 68 टक्क्यांनी वाढून 6 फेब्रुवारी 2023 रोजी 1229.90 रुपयांवर पोहोचली.

हा एका वर्षातील विक्रमी उच्चांक आहे. पण त्यानंतर शेअर्समध्ये पुन्हा विक्री झाली, आणि अजुनही म्हणावी तशी रिकव्हरी झालेली नाही.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.