
भारतात महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांचा वापर करण्यासाठी टोल द्यावा लागतो. यासाठी सरकारनं फास्टॅग सिस्टिम सुरू केली होती. मात्र अजूनही काही लोक फास्टॅगचा वापर करत नाीहत. अशा वाहनांना टोल नाक्यावर फास्टॅगशिवाय टोल भरायचा असल्यास दुप्पट पैसे आकारले जातात. मात्र १५ नोव्हेंबरपासून टोलबाबत नवे नियम लागू होणार आहेत. टोल युपीआयनेसुद्धा भरता येणार आहे.