
New UPI Rules From 30 June 2025: UPI द्वारे पेमेंट करण्याचे नियम बदलणार आहेत. डिजिटल पेमेंट सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस व्यवहारांसाठी नवीन नियम तयार केले आहेत.
हे नियम 30 जून 2025 पासून लागू होतील. याअंतर्गत, आता एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवताना त्याचे खरे नाव म्हणजेच बँकेत नोंदणीकृत असलेले नाव अॅपवर दिसेल, तुम्ही सेव्ह केलेले नाव दिसणार नाही.