Nike Layoffs: लोकप्रिय स्पोर्ट्सवेअर कंपनी Nikeचा मोठा निर्णय; 2 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार, काय आहे कारण?

Nike Layoffs: जगभरातील स्पोर्ट्सवेअर बनवणाऱ्या Nike कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. विक्रीतील घट आणि वाढती स्पर्धा यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार 2 टक्के कर्मचारी कमी केले जातील.
Nike plans to lay off over 1,600 employees Know details
Nike plans to lay off over 1,600 employees Know detailsSakal

Nike Layoffs: जगभरातील स्पोर्ट्सवेअर बनवणाऱ्या Nike कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. विक्रीतील घट आणि वाढती स्पर्धा यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार 2 टक्के कर्मचारी कमी केले जातील.

कंपनीने गेल्या वर्षीही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते, 'खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या कपातीमुळे जागतिक स्तरावर Nikeच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या सुमारे 1,600 जणांना नोकरी गमवावी लागू शकते.

अहवालानुसार, दुकाने आणि वितरण विभागातील कामगारांवर किंवा कंपनीच्या इनोव्हेशन विभागातील कामगारांवर कपातीचा परिणाम होणार नाही. 31 मे 2023 पर्यंत कंपनीकडे जागतिक स्तरावर सुमारे 83,700 कामगार होते.

Nike plans to lay off over 1,600 employees Know details
Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराचे चांदीचे नाणे अर्थ मंत्रालयाने केले जारी; कसे आणि कुठे खरेदी करायचे?

कंपनीच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षाच्या तुलनेत 30 नोव्हेंबरपर्यंत विक्रीत फक्त एक टक्का वाढ झाली आहे, सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या उत्तर अमेरिकेत कंपनीची विक्री पाच टक्क्यांनी घसरली आहे.

मंदीच्या भीतीमुळे जागतिक स्तरावर कंपन्या खर्चात कपात करत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. ट्विटर, ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्टसह अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.

Nike plans to lay off over 1,600 employees Know details
Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराचे चांदीचे नाणे अर्थ मंत्रालयाने केले जारी; कसे आणि कुठे खरेदी करायचे?

Nike कंपनीने पुढील तीन वर्षांत खर्चात 2 अब्ज डॉलर कपात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, कंपनी ऑटोमेशनवर भर देणार आहे. ऑटोमेशन वाढवण्यासोबतच, Nike उत्पादनात बदल करणार आहे आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी नवीन शैलीची उत्पादने देखील बाजारात आणणार आहे.

लेऑफची माहिती गोळा करणाऱ्या वेबसाइटच्या ताज्या आकडेवारीनुसार, 1 जानेवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान, जगभरातील 154 तंत्रज्ञान कंपन्यांनी 39,400 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com