Railway Budget 2026 : मुंबई-पुण्यासाठी हायस्पीड रेल कॉरिडॉर; विक्रमी दोन लाख ८१ हजार ३७७ कोटी रुपयांची तरतूद

Nirmala Sitharaman railway budget allocation : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२६-२७ अर्थसंकल्पात रेल्वे मंत्रालयासाठी २,८१,३७७ कोटींची मोठी तरतूद केली. हायस्पीड रेल, वंदे भारत विस्तार, सुरक्षा, आधुनिकीकरण व नवीन प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले.
Railway Budget 2026

Railway Budget 2026

sakal

Updated on

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी दोन लाख ८१ हजार ३७७ हजार कोटींची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. देशातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या सात हायस्पीड रेल कॉरिडॉरची घोषणा रेल्वेसाठी केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींचे ठळक वैशिष्ट्य ठरले आहे. रेल्वे मंत्रालयासाठी करण्यात आलेल्या तरतुदीत रेल्वे पायाभूत सुविधा, नवीन गाड्या, प्रवासी सुरक्षा आणि आधुनिकीकरणासाठी मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे.

उद्योग, बंदरे आणि दळणवळण क्षेत्राला मोठा फायदा पोहोचविण्याची क्षमता असलेला दानकुनी ते सूरत या मालवाहतुकीसाठी समर्पित पूर्व–पश्चिम नवीन कॉरिडॉरची अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे. अपघात टाळणे आणि प्रवाशांची सुरक्षितता वाढविण्याच्या उद्देशाने अर्थसंकल्पात रेल्वे सुरक्षा आणि तंत्रज्ञानावर भर देण्यात आला असून स्वयंचलित रेल्वे सुरक्षा प्रणाली ‘कवच ४.०’ अधिक मार्गांवर लागू केली जाणार आहे. तोट्यातील किंवा सीमावर्ती भागातील रेल्वे मार्गांसाठी तसेच रेल्वे कर्जावरील व्याज भरण्यासाठी सरकारकडून निधी दिला जाईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com