
Zerodha CEO Nithin Kamath:
Sakal
झिरोधाचे सीईओ नितिन कामत यांनी शेअर बाजारात नुकसान टाळण्यासाठी एक भन्नाट ट्रिक सांगितली आहे.
लाँग-टर्म गुंतवणुकीसाठी वेगळं डिमॅट अकाउंट ठेवल्यास इम्पल्स सेलिंग थांबवता येतं आणि टॅक्स सेव्हिंगही करता येते.
आता झिरोधाने गुंतवणूकदारांसाठी सेकंडरी डिमॅट अकाउंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
Zerodha CEO Nithin Kamath: शेअर बाजारातून पैसा कमावणं जितकं महत्त्वाचं आहे, त्याहून जास्त महत्त्वाचं आहे नुकसान टाळणं. झिरोधाचे (Zerodha) सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितिन कामत यांनी नुकतंच आपल्या गुंतवणुकीच्या अनुभवातून एक भन्नाट ट्रिक सांगितली आहे. ही ट्रिक वापरली, तर सर्वसामान्य गुंतवणूकदारही बाजारात अधिक चांगले पैसे कमवू शकतात.
कामत म्हणाले की, केवळ चांगले स्टॉक्स खरेदी करणं पुरेसं नाही, तर आपल्या वागणुकीवर (इमोशन्सवर) नियंत्रण ठेवणं आणि टॅक्स प्लॅनिंग योग्य करणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे.