Rs 2,000 notes withdrawn: SBIचा 2000 रुपयांच्या नोटेबद्दल मोठा निर्णय; नोटा बदलण्यासाठी...

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या सर्व शाखांना 2000 रुपयांच्या नोटेबद्दल माहिती दिली आहे.
SBI
SBI Sakal

Rs 2,000 notes withdrawn: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने शनिवारी आपल्या सर्व शाखांना सूचित केले की 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी कोणताही फॉर्म आणि कोणत्याही ओळखीचा पुरावा आवश्यक नाही.

बँकेने 20 मे रोजीच्या परिपत्रकात म्हटले आहे की, "एकावेळी 20,000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत रु. 2,000 च्या एक्सचेंजची सुविधा कोणत्याही फॉर्म शिवाय दिली जाईल."

दोन हजाराची नोट का रद्द केली?

सन २०१६ च्या नोटबंदीनंतर पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेतल्यामुळे लोकांना व्यवहार करण्यासाठी तातडीने दोन हजार रुपयांच्या या नोटा चलनात आणल्या होत्या.

मात्र कालांतराने चलनात इतर नोटा पुरेशा संख्येने आल्यामुळे आता दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्यात आल्या आहेत, असे स्पष्टीकरण रिझर्व बँकेने दिले आहे.

चलनात इतर नोटा (दहा रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत) पुरेशा संख्येने आल्यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई देखील २०१८ नंतर थांबवली होती. यातील बऱ्याचश्या नोटा २०१७ पूर्वी छापल्याने त्यांचे आयुष्यही संपत आले होते.

तसेच या नोटा चलनात फार मोठ्या प्रमाणावर वापरल्या जात नव्हत्या, असेही ध्यानात आले होते. त्यामुळे क्लीन नोट पॉलिसीनुसार या नोटा रद्द करण्यात आल्याचे रिझर्व बँकेने म्हटले आहे. लोकांना चांगल्या दर्जाच्या नोटा मिळाव्यात ही रिझर्व बँकेची क्लीन नोट पॉलिसी आहे.

ज्यांचे बँक खाते नाही, ते 2000 रुपयांच्या नोटा कशा बदलणार?

आरबीआयच्या या नव्या निर्णयानुसार ज्यांचे बँक खाते नाही ते लोक 2000 रुपयांच्या नोटा बदलू शकणार नाहीत का?

आरबीआयने यासाठीही व्यवस्था केली आहे आणि आपल्या निर्णयात स्पष्टपणे लिहिले आहे की ज्यांचे बँक खाते नाही ते देखील बँकेत जाऊन 20,000 रुपयांपर्यंतच्या 2000 च्या नोटा एकावेळी बदलू शकतात.

SBI
Supreme Court: आयकर कायद्याच्या कलम 69A अंतर्गत, चोराला चोरीच्या मालमत्तेचा...सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

2000 रुपयांच्या नोटा बदलण्याबाबत RBI च्या काय सूचना आहेत?

  • 23 मे पासून 2000 रुपयांच्या नोटा कोणत्याही बँकेत बदलता किंवा जमा करता येतील.

  • 30 सप्टेंबर 2023 पर्यंत कोणत्याही बँकेच्या शाखेत 2000 रुपयांच्या नोटा बदलता येतील.

  • एका वेळी 20,000 रुपये बँकेत बदलले किंवा जमा केले जाऊ शकतात.

  • आरबीआयच्या 19 शाखांमध्येही नोटा बदलता येतील.

  • याचा अर्थ आरबीआय आणि इतर सर्व बँकांमध्ये नोटा बदलता येतील.

  • एकूण रक्कम एकावेळी 20,000 रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही.

SBI
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com