
जिओने 249 रुपयांचा 1GB डेटा प्लान बंद करून नवा 299 रुपयांचा 1.5GB डेटा प्लान लाँच केला.
एअरटेलनेही आपला स्वस्त प्लान बंद केला असून Vi पण हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
आता ग्राहकांना किमान 1.5GB रोजच्या डेटासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
Jio Vs Airtel Plan: मोबाइलवर इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. रिलायन्स जिओने आपला एंट्री-लेव्हल 249 रुपयांचा प्रीपेड प्लान (ज्यात दररोज 1GB डेटा मिळत होता) बंद केला आहे. जिओच्या या निर्णयानंतर भारती एअरटेलनेही अशाच किंमतीचा प्लान काढून टाकला आहे.