Ambani Children Salary: वडिलांच्या पावलावर पाऊल, आकाश, अनंत आणि ईशा अंबानींनी केली मोठी घोषणा

Ambani Children Salary: रिलायन्स इंडस्ट्रीजने शेअरहोल्डर्सना मंजुरीसाठी पोस्टाद्वारे पत्र पाठवले आहे.
Ambani Children Salary
Ambani Children SalarySakal
Updated on

Ambani Children Salary: भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी पगार घेत नाहीत ही गोष्ट अनेकजणांना माहिती नसेल. त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून पगार घेतला नाही. आता त्यांच्या तीन मुलांनीही मुकेश अंबानींच्या पावलावर पाऊल ठेवत तोच मार्ग स्वीकारला आहे.

मुकेश अंबानींची तीन मुले म्हणजेच आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी हे कोणताही पगार घेणार नाहीत. त्यांना फक्त संचालक मंडळ आणि समित्यांच्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी फी दिले जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com