
India Pakistan Tension: पहलगाममधील घटनेमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अधिकच वाढला आहे आणि दोन्ही देशांमध्ये नव्या राजनैतिक संघर्षाची सुरुवात झाली आहे. भारताने सिंधू जल करार निलंबित केला असून त्यामुळे पाकिस्तानातील 20 कोटीहून अधिक लोकांवर परिणाम होणार आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे, ज्याचा मोठा फटका भारतीय विमान कंपन्यांना बसणार आहे.