Cyber Fraud: ...अन्यथा दिवाळीत बसेल झटका, 'दिवाळी' अन् 'पूजा' नावानं डोमेन तयार करुन होतेय फसवणूक

Cyber Fraud: दिवाळीत सायबर गुन्हेगारीत लक्षणीय वाढ झाली
Online fraud using 'Diwali' and 'Puja' domains; Use these tips to stay safe
Online fraud using 'Diwali' and 'Puja' domains; Use these tips to stay safe Sakal

Cyber Fraud: काल पासून सणासुदीला सुरुवात झाली आहे. अनेकांनी दिवाळीची खरेदी केली आहे. तर, काही लोकांना खरेदीसाठी वेळ काढणे शक्य नाही. अशा परिस्थितीत ते घरी बसून किंवा प्रवास करताना खरेदी करणे पसंत करतात, ज्यासाठी ऑनलाइन हा एकमेव सोपा मार्ग आहे.

ऑनलाइनच्या माध्यमातून तुमची अनेक कामे सोपी झाली असली तरी सायबर गुन्ह्याच्या दृष्टीने ते सुरक्षित नाही. फसवणूक करणारे लोक सणासुदीच्या काळात लोकांवर अधिक लक्ष ठेवतात आणि लोकांना अडकवण्यासाठी ते विविध पद्धतींचा अवलंब करतात.

अलीकडील अहवालात, CloudSEK मधील सायबरसुरक्षा संशोधकांनी सणासुदीच्या हंगामाचे भांडवल करून सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याचे म्हणले आहे.

"दिवाळी" आणि "पूजा" च्या लोकप्रिय नावांचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार विशेषत: ई-कॉमर्स वेबसाइट्सच्या माध्यमातून वापरकर्त्यांना फसवण्यासाठी फसव्या डोमेनचा वापर करत आहेत.

CloudSEK मधील सायबरसुरक्षा संशोधकांनी Facebook जाहिरातीमध्ये 828 डोमेन नावांचा वापर जास्त होत असल्याचा दावा केला आहे.

CloudSEK मधील सायबर इंटेलिजन्स ऋषिका देसाई यांनी या वर्षी ऑनलाइन खरेदी घोटाळ्यांसाठी डिझाइन केलेल्या बनावट डोमेनमध्ये लक्षणीय वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

Online fraud using 'Diwali' and 'Puja' domains; Use these tips to stay safe
Hero MotoCorp: हीरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजाळ यांच्यावर ईडीची कारवाई, 24.95 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

फसवी डोमेन तयार करण्यासाठी टायपोस्कॅटिंग तंत्राचा वापर केला जात असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. सणासुदीच्या निमित्ताने अनेक प्रकारचे मेसेज व्हायरल होतात, त्यातील काही रिवॉर्ड्स किंवा कॅशबॅक सारख्या ऑफर्स असतात.

असे व्हायरल मेसेज फसवणूक करणाऱ्यांनी पसरवलेला सापळा असू शकतो. त्यामध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधणे किंवा लिंकवर क्लिक करणे तुमच्या बँक खात्यासह तुमच्या वैयक्तिक डेटासाठी धोकादायक ठरू शकते.

तुम्हाला कोणत्याही कॉल, ईमेल किंवा मेसेजद्वारे मोफत भेटवस्तूंसारख्या ऑफर मिळाल्यास त्याकडे दुर्लक्ष करा. लिंकवर क्लिक केल्याने किंवा इतर कोणत्याही प्रकारे त्यांच्याशी संपर्क साधल्यास तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता.

Online fraud using 'Diwali' and 'Puja' domains; Use these tips to stay safe
PM Kisan Yojana: तारीख ठरली! 'या' दिवशी येणार 15 वा हप्ता, शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड

ऑनलाइन घोटाळ्यांपासून सुरक्षित राहण्यास काही टिप्स

  • संशयास्पद ईमेल आणि मेसेजबद्दल सतर्क रहा

  • पासवर्ड ठेवताना काळजी घ्या

  • सॉफ्टवेअर आणि अँटीव्हायरस प्रोग्राम्स अपडेट ठेवा

  • विश्वासार्ह संकेतस्थळांवरुन खरेदी करा

  • अज्ञात स्त्रोताकडून आलेल्या संदेशांना उत्तर देऊ नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com