
केंद्र सरकारनं ऑनलाइन गेमिंग बिल 2025 राज्यसभेतही पारित केलं असून, रिअल-मनी गेम्सवर पूर्ण बंदी लागू होणार आहे.
या निर्णयामुळे 17.46 कोटींच्या जाहिरात खर्चावर गंडांतर येणार आहे. रणबीर कपूर, आमिर खान, धोनी, ऋतिक रोशन यांसारखे सेलिब्रिटी या जाहिरातींमध्ये आहेत.
बिलानुसार प्रमोशन करणाऱ्यांना 2 वर्षांची जेल व 50 लाखांचा दंड होऊ शकतो, त्यामुळे बॉलिवूड आणि खेळाडूंमध्ये चिंता वाढली आहे.
Online Gaming Bill: ऑनलाइन गेमिंगवर केंद्र सरकारनं आणलेलं ‘प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग बिल, 2025’ लोकसभेनंतर राज्यसभेतही पारित झालं आहे. या कायद्यामुळे रिअल-मनी गेम्सवर संपूर्ण बंदी लागू होणार असून त्याचा थेट फटका जाहिरात क्षेत्राला बसणार आहे.