ChatGPT बनवणारी कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर? दिवसाचा खर्चही झेपेना

ChatGPT Maker Bankruptcy: अहवालानुसार, कंपनीचा नफा कमी झाला आहे तर दैनंदिन खर्च करोडोंमध्ये आहे.
OpenAI Bankruptcy
OpenAI BankruptcySakal

OpenAI Bankruptcy: ChatGPT ने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात क्रांती केली. OpenAI कंपनीला दिवाळखोरीचा धोका आहे. एका अहवालानुसार, कंपनीचा नफा कमी झाला आहे तर दैनंदिन खर्च करोडोंमध्ये आहे. 'चॅट-जीपीटी' चालवण्यासाठी लागणारा खर्चही कंपनी पूर्ण करू शकत नाही. या सर्व बाबी एका अहवालातून समोर आल्या आहेत.

'चॅट-जीपीटी' सॅम ऑल्टमन यांनी विकसित केले आहे. त्यांचा स्टुडिओ 'ओपन-एआय' सध्या आर्थिक संकटांचा सामना करत आहे. अॅनालिटिक्स इंडिया मॅगझिनच्या अहवालानुसार 2024 च्या अखेरीस कंपनी दिवाळखोर होऊ शकते.

'चॅट-जीपीटी' चालवण्याचा रोजचा खर्च 5.80 कोटी रुपये

अहवालात असे म्हटले आहे की 'चॅट-जीपीटी'साठी 'ओपन-एआय'ला दररोज 7 लाख डॉलर म्हणजेच (5.80 कोटी रुपये) खर्च करावे लागतील. कंपनीची आर्थिक संसाधने झपाट्याने कमी होत आहेत.

जरी कंपनी सतत आपल्या 'GPT 3.5' आणि 'GPT-4' टूल्सवर कमाई करण्याचा प्रयत्न करत आहे. असे असूनही, कंपनीचा महसूल खर्चासाठी पुरेसा नाही.

OpenAI Bankruptcy
Adani Group: अदानी ग्रुपमधील गुंतवणुकीवर LIC प्रमुखांचे मोठे वक्तव्य, गुंतवणूक करून आम्हाला...

लॉन्चच्या वेळी 'चॅट-जीपीटी'ला बाजारात चांगला प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला त्याचा यूजर बेस खूप वाढला होता, पण गेल्या काही महिन्यांत त्यांचा यूजर बेस खूप कमी झाला आहे.

SimilarWeb डेटानुसार, जुलै 2023 मध्ये जूनच्या तुलनेत 'चॅट-जीपीटी' वापरकर्त्यांची संख्या 12 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यांची संख्या जूनमध्ये सुमारे 17 अब्ज होती, जी जुलैमध्ये कमी होऊन 15 अब्ज झाली.

OpenAI Bankruptcy
Adani Group: गौतम अदानींना मोठा धक्का! डेलॉइटने सोडले कंपनीचे काम; पुढे काय होणार?

यामुळे 'चॅट-जीपीटी'चेही नुकसान होत असून महसूल मिळवण्यात अडचणी येत आहेत. याशिवाय आणखी एक कारण म्हणजे बाजारपेठेत वाढलेली स्पर्धा.

बाजारात अनेक ओपन सोर्स लँग्वेज मॉडेल्स उपलब्ध आहेत, जे 'चॅट-जीपीटी'ला आव्हान देणारे आहेत. 'चॅट-जीपीटी'चे मुख्य प्रतिस्पर्धी गुगल आणि मेटा-फेसबुकसारख्या कंपन्या आहेत.

त्याचवेळी टेस्लाच्या एलोन मस्कने त्यांच्या 'एक्स' प्लॅटफॉर्मखाली 'TruthGPT' लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. यासाठी तो 10 दशलक्ष डॉलरहून अधिक गुंतवणूक करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com