Investment Opportunity : जौनपूर-हापुरमध्ये डिस्ट्रिक्ट जेल बनवायची ऑर्डर, या कंपनीच्या शेअर्समध्ये झटपट तेजी...

आरपीपी इन्फ्रा प्रोजेक्ट्सला 310.92 कोटीच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. कंपनीने नुकतीच एक्सचेंज फायलिंगमध्ये ही माहिती दिली.
order to build district jail in Jaunpur-Hapur the shares of this company quickly rose
order to build district jail in Jaunpur-Hapur the shares of this company quickly roseSakal
Updated on

एखाद्या कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली की त्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ पाहायला मिळते. नुकतेच आरपीपी इन्फ्रा प्रोजेक्ट्सच्या (RPP Infra Projects) बाबतीत अगदी असेच घडले. कंपनीला 310 कोटीच्या ऑर्डर्स मिळाल्या आणि त्याचे पूर्ण मार्केट कॅप 629.06 कोटी आहे. एवढी मोठी ऑर्डर मिळाल्यावर, त्याचे शेअर्स इंट्रा-डेमध्ये 18.10 टक्क्यांनी उडी मारून बीएसईवर जवळपास 6 वर्षात 169.65 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले.

गुंतवणुकदारांनी केलेल्या प्रॉफिट-बुकिंगमुळे शेअर्स थोडे कमीवर आले पण तरीही ते मजबूत स्थितीत आहेत. दिवसअखेर, तो बीएसईवर 15.42 टक्क्यांच्या तेजीसह 165.80 रुपयांवर बंद झाला.

आरपीपी इन्फ्रा प्रोजेक्ट्सला 310.92 कोटीच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. कंपनीने नुकतीच एक्सचेंज फायलिंगमध्ये ही माहिती दिली. युपीच्या हापूरमध्ये नवीन जिल्हा कारागृहाच्या बांधकामासाठी ही ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला हे जेल इंजिनीअरिंग, प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन (EPC) मॉडेलवर बांधायचे आहे.

या काँट्रॅक्टची व्हॅल्यू 158.82 कोटी असून त्यात जीएसटीचा समावेश आहे. या कारागृहाची क्षमता 1026 कैदी ठेवण्याची असेल. याशिवाय, कंपनीला जौनपूरमध्ये याच क्षमतेच्या नवीन जिल्हा कारागृहाच्या बांधकामासाठी 152.11 कोटीची ऑर्डरही मिळाली आहे. हा प्रोजेक्ट 18 महिन्यांत पूर्ण होणार आहे. जून 2024 पर्यंत, त्यांची ऑर्डर बुक सुमारे 3200 कोटीची आहे.

आरपीपी इन्फ्राच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना कायमच चांगला नफा मिळवून दिला आहे. गेल्या वर्षी 14 ऑगस्ट 2023 रोजी तो 58 रुपयांच्या एका वर्षातील नीचांकी पातळीवर होता. या पातळीपासून, तो 11 महिन्यांत 193 टक्क्यांनी झेप घेऊन 169.65 रुपयांवर पोहोचला आहे. त्याच्या शेअर्सचा हा सहा वर्षांतील उच्चांक आहे.

order to build district jail in Jaunpur-Hapur the shares of this company quickly rose
Larsen & Toubro L&T India : लार्सन एंड टुब्रोला 15000 कोटीची मेगा ऑर्डर, शेअर्सवर चांगला परिणाम...

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.