June 2023 Deadlines: पॅन-आधार लिंक करण्यापासून ते अ‍ॅडव्हान्स टॅक्सपर्यंत, ही 3 महत्त्वाची कामे आजच पूर्ण करा, अन्यथा होईल नुकसान

पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करण्यापासून ते अॅडव्हान्स टॅक्सपर्यंतच्या कामाची मुदत 30 जून म्हणजेच आज संपत आहे.
June 2023 Deadlines
June 2023 DeadlinesSakal

30th June Financial Work Deadline End: पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करण्यापासून ते अॅडव्हान्स टॅक्सपर्यंतच्या कामाची मुदत 30 जून म्हणजेच आज संपत आहे.

यातील काही कामांची मुदत गेल्या वेळेपेक्षा यावेळी वाढवण्यात आली आहे. कर्मचारी आणि करदात्यांसाठी ही मुदत महत्त्वाची आहे. तुम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करायचा नसेल तर ही कामे आजच पूर्ण करा.

पॅन-आधार लिंक:

प्राप्तिकर विभागाने 31 मार्चच्या आधीच्या मुदतीपासून 30 जून 2023 पर्यंत कायम खाते क्रमांक (PAN) आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. ही लिंक न केल्यास त्या व्यक्तीचे पॅनकार्ड 1 जुलैपासून निष्क्रिय होईल.

पॅनशी आधार लिंक करण्यासाठी 1,000 रुपये विलंब शुल्क भरावा लागेल. जर हे पेमेंट केले नाही तर तुमचे पॅन कार्ड लिंक केले जाणार नाही. जर पॅन कार्ड आधारशी लिंक नसेल तर तुम्ही ITR ते सरकारी योजनांशी संबंधित अनेक गोष्टी करू शकणार नाही.

बँक लॉकर करार:

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत नवीन लॉकर करारांचे नूतनीकरण पूर्ण करण्याची अंतिम मुदत दिली आहे, ज्यामध्ये 30 जूनपर्यंत 50 टक्के आणि 30 सप्टेंबरपर्यंत 75 टक्के नोंदणीचे काम करायचे आहे.

बँकांना स्टॅम्प पेपरवर लॉकर करारनामा तयार करणे आवश्यक आहे. लॉकरधारकांचे हित जपण्यासाठी हा सुधारित करार करण्यात आला आहे. आरबीआयला आता अपेक्षा आहे की बँक 30 जूनपर्यंत 50 टक्के आणि 30 सप्टेंबरपर्यंत 75 टक्के नोंदणीचे काम करेल.

ज्या ग्राहकांनी 31 डिसेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी बँक लॉकर करारनामा जमा केला असेल, तर तुम्हाला नवीन बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करावी लागेल. कोणत्याही प्रकारची आग किंवा चोरी झाल्यास नुकसानभरपाई देण्याबाबत आरबीआयने नवीन धोरण तयार केले आहे.

जर ग्राहकांनी बँक लॉकरच्या नवीन करारावर स्वाक्षरी केली नाही, तर लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंच्या सुरक्षिततेशी संबंधित नवीन नियम लागू होणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

June 2023 Deadlines
TCS Job Scam: लाच घेतल्याप्रकरणी TCS ची मोठी कारवाई, 6 कर्मचाऱ्यांचे निलंबन अन् 6 जॉब पोर्टलवर घातली बंदी

आगाऊ कर भरणा:

जर तुम्ही व्यापारी असाल किंवा नोकरी करत असाल आणि तुमचा कर 10 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुमच्यासाठी तो विहित मुदतीत भरणे फार महत्वाचे आहे.

जर तुम्ही वेळेत अॅडव्हान्स टॅक्स भरला नाही, तर एकूण अॅडव्हान्स टॅक्सच्या रकमेवर पहिल्या तीन हप्त्यांवर 3% आणि शेवटच्या हप्त्यावर 1% व्याज द्यावे लागेल. यामुळे तुमच्या खिशावरचा भारच वाढेल. म्हणूनच या दिवशीच आगाऊ कर भरावा. अन्यथा, तुम्हाला आयकर सूचनेलाही सामोरे जावे लागू शकते.

June 2023 Deadlines
Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com