YouTube Layoffs: यूट्यूबने घेतला कठोर निर्णय! पगार वाढवून मागितला म्हणून कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

YouTube Music layoffs: यूट्यूब म्युझिकच्या एका टीममध्ये 43 कर्मचाऱ्यांचा समावेश होता, त्यांनी चांगले वेतन आणि सुविधा मागितल्यानंतर त्यांना काढून टाकण्यात आले, असे अहवालात म्हटले आहे. कर्मचाऱ्यांना Googleने नियुक्त केले होते.
YouTube
YouTube Sakal

YouTube Music layoffs: यूट्यूब म्युझिकच्या एका टीममध्ये 43 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश होता, त्यांनी चांगले वेतन आणि सुविधा मागितल्यानंतर त्यांना काढून टाकण्यात आले असे अहवालात म्हटले आहे. कर्मचाऱ्यांना Googleने नियुक्त केले होते. (Part of YouTube Music team fired after asking for better pay and benefits)

कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली की त्यांच्या 43 जणांच्या टीमला काढून टाकण्यात आले आहे. जॅक बेनेडिक्ट यांनी द वॉशिंग्टन पोस्टला सांगितले की, आम्हाला जेव्हा कळले की कामावरुन काढून टाकले आहे तेंव्हा आम्हाला धक्का बसला होता आणि काय करावे हे कळत नव्हते. पण सर्वात महत्त्वाचे आम्ही पगार वाढ आणि चांगल्या सुविधा मागितल्यामुळे त्यांना राग आला असेल.

आणखी कर्मचाऱ्यांनी अशाच प्रकारच्या मागण्या करू नयेत यासाठी कंपनीने असे पाऊल उचलले असावे. अहवालानुसार, कामगारांनी असेही सांगितले की त्यांना त्यांच्या कामावरून कमी करण्याबाबत कोणतीही पूर्वसूचना मिळाली नव्हती.

दरम्यान, Google च्या प्रवक्त्याने सांगितले की, देशभरातील आमच्या पुरवठादारांसोबतचे करार संपले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे त्यांना काम शोधण्यासाठी सात आठवड्यांचा पगारी वेळ दिला जाईल.

YouTube
BSE Stock: बीएसईच्या नावावर आणखी एक विक्रम; जागतिक बाजारात भारतीय शेअर बाजार सर्वात पुढे

गेल्या वर्षी यूट्यूब म्युझिक कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांनी चांगले वेतन आणि चांगल्या सुविधांची मागणी करत युनियनला मतदान केल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कामगारांनी मागणी केल्यानंतर Google ने नंतर कंत्राटी कामगारांशी वाटाघाटी करण्यास नकार दिला.

अलीकडेच स्नॅपचॅटची मूळ कंपनी स्नॅपने कर्मचारी कपात केली आहे. कंपनी आपल्या 500 हून अधिक कर्मचाऱ्यांना कमी करणार आहे. अलीकडच्या काळात अनेक छोट्या-मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात जाहीर केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, Amazon आणि Alphabet सारख्या टेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली होती. आता या यादीत स्नॅपचाही समावेश झाला आहे.

YouTube
‘ईटीएफ’चा पर्याय महिलांसाठी लाभदायी

सोशल मीडिया कंपनी Snap ही 2024 मध्ये कर्मचारी कपात सुरू ठेवणारी नवीन टेक कंपनी आहे. एकट्या जानेवारीमध्ये सुमारे 24,000 तंत्रज्ञान कामगारांनी नोकऱ्या गमावल्या आहेत.

Layoffs.fyi नुसार, व्याजदरात वाढ आणि तांत्रिक मंदीच्या वातावरणात कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यास सुरुवात केली आहे. Layoffs.fyi ने म्हटले आहे की अलिकडच्या वर्षांत कर्मचारी कपात मोठ्या प्रमाणावर झाली आहे. कर्मचारी कपातीचे मुख्य कारण म्हणजे आर्थिक मंदी आहे, परंतु काही कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेचे कारण सांगत आहेत कारण त्यांचे लक्ष AI वर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com