Paytm FASTags: 2 कोटींहून अधिक पेटीएम FASTag वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी; रोड टोलिंग ऑथॉरिटीने...

Paytm FASTags: रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार पेटीएम पेमेंट्स बँकेच्या विविध सेवा बंद करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेच्या अनेक सेवा आधीच प्रभावित झाल्या आहेत. तर पेटीएम वॉलेट आणि फास्टॅग सारख्या सेवा 29 फेब्रुवारीनंतर बंद होणार आहेत.
Paytm not in list of 32 banks authorised to issue new FASTags
Paytm not in list of 32 banks authorised to issue new FASTagsSakal

Paytm FASTags: रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार पेटीएम पेमेंट बँकेच्या विविध सेवा बंद करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. पेटीएम पेमेंट बँकेच्या अनेक सेवा आधीच बंद झाल्या आहेत. तर पेटीएम वॉलेट आणि फास्टॅग सारख्या सेवा 29 फेब्रुवारीनंतर बंद होणार आहेत. दरम्यान, पेटीएमचा फास्टॅग वापरणाऱ्या करोडो वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

रोड टोलिंग ऑथॉरिटीने महामार्गावरील प्रवाशांना पेटीएम पेमेंट बँक वगळता 32 बँकांची यादी करून अधिकृत बँकांकडून फास्टॅग खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

Paytm not in list of 32 banks authorised to issue new FASTags
Reliance: अंबानी टाटा प्लेमधील हिस्सा खरेदी करणार? नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉनला देणार टक्कर

इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी (IHMCL), भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या इलेक्ट्रॉनिक टोलिंग युनिटने त्यांच्या X हँडलवरून एक अपडेट शेअर केली आहे. IHMCL ने 32 बँकांची यादी जारी केली आहे जिथून वापरकर्ते फास्टॅग खरेदी करू शकतात. फास्टॅग देणाऱ्या बँकांच्या यादीतून पेटीएम पेमेंट बँकेचे नाव नाही.

पेटीएम फास्टॅगच्या वापरकर्त्यांची संख्या जवळपास 2 कोटी आहे. टोल प्लाझावर टोल टॅक्स भरण्यासाठी वाहनांना फास्टॅग आवश्यक आहे. फास्टॅगद्वारे टोल भरल्यास कमी पैसे खर्च होतातच पण वेळेचीही बचत होते.

Paytm not in list of 32 banks authorised to issue new FASTags
UK Economy: पीएम ऋषी सुनक चिंतेत! इंग्लंडमध्ये मंदीचे सावट; भारताला धोका आहे का?

29 फेब्रुवारीनंतर पेटीएम फास्टॅग रिचार्ज करणे शक्य होणार नसल्यामुळे आणि फास्टॅग जारी करणाऱ्या बँकांच्या नवीन यादीमध्ये पेटीएम पेमेंट बँकेचे नाव नसल्याने, त्यांच्या 2 कोटींहून अधिक वापरकर्त्यांकडे त्यांचा पेटीएम फास्टॅग रिचार्ज करण्याचा एकच पर्याय उरला आहे. फास्टॅग बंद करा आणि यादीत समाविष्ट असलेल्या 32 बँकांपैकी कोणत्याही बँकेकडून नवीन फास्टॅग खरेदी करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com