

Petrol to Rise by ₹18, Diesel by ₹35? Shocking Report Sparks Panic
eSakal
Petrol-Diesel Rate: सध्या सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षाचा परिणाम भारतीय तेल कंपन्यांवर होत आहे. सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांसाठी पेट्रोल आणि डिझेलची विक्री ही सध्या तोट्यात असल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाने आधीच सांगितले आहे. सद्यस्थितीत त्यांना पेट्रोलवर प्रति लिटर अंदाजे 18 रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर अंदाजे 35 रुपयांचा तोटा होत आहे. जागतिक बाजारात किमती वाढल्या असूनही देशांतर्गत किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र मॅकक्वेरी ग्रुपच्या अहवालानुसार या महिन्याच्या शेवटी किमती वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.