Petrol-Diesel Price: पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल महागले, जाणून घ्या ताजे दर

Petrol-Diesel Price: मंगळवारी 2 जानेवारी 2024 रोजी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल झाला आहे. तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. आजह राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
petrol diesel price today 2 january 2024
petrol diesel price today 2 january 2024 Sakal

Petrol-Diesel Price: मंगळवारी 2 जानेवारी 2024 रोजी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल झाला आहे. तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. आज राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र, काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहे.

त्याचबरोबर अनेक राज्ये अशी आहेत जिथे आज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. अशा परिस्थितीत, आज देशात पेट्रोल आणि डिझेल कोणत्या दराने उपलब्ध आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

  • दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे.

  • मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे.

  • कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे.

  • चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

  • पुण्यात पेट्रोलचा दर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे.

petrol diesel price today 2 january 2024
UPI Transaction: ‘यूपीआय’ व्यवहारांनी गाठला नवा उच्चांक; डिसेंबरमध्ये १२.०२ अब्ज व्यवहार

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पेट्रोलचे दर वाढले

महाराष्ट्रात पेट्रोलच्या दरात 43 पैशांनी वाढ झाली आहे. आज पेट्रोलचा दर 106.64 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे. तर डिझेलच्या दरात 42 पैशांनी वाढ होऊन तो 93.15 रुपये प्रतिलिटर झाला आहे.

याशिवाय आंध्र प्रदेश, गोवा, छत्तीसगड, ओडिशा, केरळ, जम्मू-काश्मीर, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

petrol diesel price today 2 january 2024
GST Collection: जीएसटीने भरली सरकारी तिजोरी! संकलन डिसेंबरमध्ये १.६४ लाख कोटी रुपयांवर

सरकारी मालकीच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या कंपन्या मागील महिन्यातील सरासरी आंतरराष्ट्रीय किंमतीच्या आधारे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला स्वयंपाकाचा गॅस आणि विमान इंधनाच्या किंमतींचा आढावा घेतला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com