Petrol Diesel Price : डोनाल्ड ट्रम्पना मध्यावधी निवडणुकांत झटका बसताच कच्च्या तेलांचे दर कोसळले; आज भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग?

India Fuel Rates : ऑक्टोबरमध्ये ट्रम्प यांच्या इराणवर हल्ल्याच्या धमकीनंतर तेल दर सहा महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले होते, पण निवडणूक निकालांनंतर दबाव निर्माण झाला आहे. ५ नोव्हेंबर रोजी मुंबईत पेट्रोल १११.२१ रुपये, दिल्लीत १०२.१२ रुपये आहे.
Petrol and Diesel Rates in Delhi, Mumbai, Chennai and Kolkata

Petrol and Diesel Rates in Delhi, Mumbai, Chennai and Kolkata

esakal

Updated on: 

Petrol Diesel Price Today: Latest Rates on 5 November : अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला पराभवाला सामोर जावे लागले आहे. दरम्यान इराणशी संबंधित संघर्ष लवकर संपण्याची शक्यता निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूडचा दर तब्बल ८.९८ डॉलरने घसरून प्रति बॅरल ९४.६२ डॉलरवर आला आहे. मात्र, या घसरणीनंतरही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता इंधनाचे नवे दर जाहीर केले असून, सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला नाही.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...