

Petrol and diesel price updates across Maharashtra and major Indian cities on 15 November 2026
esakal
महाराष्ट्रासह देशभरात आज, रविवार (१५ नोव्हेंबर) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तेल विपणन कंपन्यांनी इंधनाचे दर स्थिर ठेवले आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर १११.२१ रुपये, तर डिझेलचा दर ९७.८३ रुपये प्रतिलिटर आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली असून, ऑक्टोबरमध्ये ११६ डॉलरपर्यंत पोहोचलेला प्रति बॅरल भाव आता सुमारे ९० डॉलरच्या आसपास आला आहे. मात्र, कच्च्या तेलाचे दर कमी होऊनही कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलची विक्री अद्याप तोट्यात केली जात आहे.