

Petrol-Diesel Rate Today: PM Modi’s Fuel Saving Appeal Sparks Big Discussion on New Prices
eSakal
Petrol-Diesel Price: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 मे रोजी तेलंगणा येथून पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संकटामुळे नागरिकांना इंधनाचा वापर कमी करण्याचे आणि संसाधनांची बचत करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे एवढे दिवस न दिसणारी देशाच्या ऊर्जा सुरक्षेबाबतची चिंता आता वाढताना दिसत आहे. परिणामी देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता काही अहवालांमध्ये वर्तविण्यात आल्याने आज 12 मे रोजी नेमका दर काय आहे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.