

PF Claim Rejected: PF Money Not Received? Employees Can Approach Consumer Court Against EPFO
eSakal
EPFO PF Claim Delay Rule: खासगी नोकरी करणाऱ्या जवळपास प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारातून दर महिन्याला भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) म्हणजेच 'पीएफ'ची रक्कम कपात केली जाते. निवृत्तीनंतर किंवा नोकरी बदलल्यानंतर ही रक्कम उपयोगी पडेल, या अपेक्षेने कर्मचारी नियमितपणे पीएफ जमा करत असतो.
मात्र, प्रत्यक्षात अनेक कर्मचाऱ्यांना स्वतःचेच पैसे मिळविण्यासाठी कित्येक महिने ईपीएफओ कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. कधी क्लेम प्रलंबित राहतो, कधी ट्रान्सफर होत नाही, तर कधी कोणतेही ठोस कारण न देता अर्ज वारंवार नाकारला जातो. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी नेमके काय करावे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.