
EPF Interest Rate: देशभरातील तब्बल 7 कोटी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (PF) योजनेचे सदस्य आहेत आणि त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आर्थिक वर्ष 2024-25 साठी केंद्र सरकारने 8.25 टक्के व्याजदर कायम ठेवत, पीएफवरील व्याज थेट खात्यात जमा केलं आहे. जवळपास सर्व EPF खात्यांमध्ये हे व्याज जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.