

PF Money in Minutes! EPFO’s Big UPI Update Will Change Withdrawals Forever
eSakal
EPFO Update on UPI: EPFOकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या लाखो खातेधारकांना मोठा दिलासा देणार आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, UPI द्वारे त्वरित PF चे पैसे काढण्याची सुविधा मे 2026 अखेरपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हा बदल EPFO च्या नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म, CITES 2.0 अंतर्गत लागू केला जात आहे, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी होईल. EPFO मध्ये सध्या 79.8 कोटी सदस्य आहेत, ज्यात 8.2 कोटी निवृत्तीवेतनधारकांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्वांना त्याचा फायआद होईल.