

PhonePe Cashback Offer: डिजिटल पेमेंट कंपनी PhonePeने प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्या दरम्यान मोठी घोषणा केली आहे. कंपनीने ‘महा कुंभ का महाशगुन’ ऑफर लॉन्च केली आहे. या अंतर्गत प्रयागराज शहरातील जे फोन पेचे पहिले युजर्स असतील त्यांच्या पहिल्या व्यवहारावर 144 रुपयांचा फ्लॅट कॅशबॅक मिळवू शकतात. ही ऑफर 26 फेब्रुवारी रोजी कुंभमेळा संपेपर्यंत सुरु राहणार आहे.