
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नसेल तर त्यांना हप्ता मिळणार नाही.
योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये (3 हप्ते, प्रत्येकी 2,000 रुपये) बँक खात्यात थेट जमा होतात.
PM Kisan Yojana: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांचा प्रमुख उदरनिर्वाहाचा स्त्रोत शेती असला तरी, आजही अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या खूपच मागे आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.