PM Kisan Samman Nidhi : प्रतिक्षा संपली ! देशातील १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी जमा होणार २००० रुपये

PM Kisan 21st Installment : पीएम किसान सन्मान निधीच्या २१व्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा होणार आहेत. या हप्त्याचा १० कोटी शेतकऱ्यांना लाभ होईल. केवायसी नसलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही.
PM Kisan 21st installment of ₹2000 will be deposited into farmers' bank accounts on 19 November 2025.

PM Kisan 21st installment of ₹2000 will be deposited into farmers' bank accounts on 19 November 2025.

esakal

Updated on

Summary

  1. पंजाब, हरियाणा, हिमाचल आणि J&K मधील शेतकऱ्यांना हप्ता आगाऊ मिळाला आहे.

  2. या योजनेत वर्षाला ६००० रुपयांचे चे तीन हप्त्यांत थेट लाभ हस्तांतरण केले जाते.

  3. लाभ घेण्यासाठी ई-केवायसी आणि जमीन नोंदी पात्रता आवश्यक आहे.

PM Kisan 21st Installment Date 2025 : देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकार चालवत असलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेच्या २१ व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते १९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपयांचा हप्ता जमा करण्यात येणार आहे. देशभरातील १० कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com