India Thali Prices: सर्वसामान्यांना मोठा झटका; जेवणाची थाळी झाली महाग, काय आहे कारण?

India Thali Prices: जानेवारी महिन्यात घरगुती शाकाहारी थाळी वार्षिक आधारावर पाच टक्क्यांनी महाग झाली, तर मांसाहारी थाळी 13 टक्क्यांनी स्वस्त झाली. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
Thali prices ease in January as onions and tomato prices decline
Thali prices ease in January as onions and tomato prices decline Sakal

India Thali Prices: जानेवारी महिन्यात घरगुती शाकाहारी थाळी वार्षिक आधारावर पाच टक्क्यांनी महाग झाली, तर मांसाहारी थाळी 13 टक्क्यांनी स्वस्त झाली. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

CRISIL मार्केट इंटेलिजन्स अँड ॲनालिटिक्स (MI&A) रिसर्चने जारी केलेल्या तांदळाच्या रोटीच्या दराच्या अंदाजानुसार, डाळी, तांदूळ, कांदा आणि टोमॅटो यासारख्या वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळे जानेवारीमध्ये घरगुती शाकाहारी थाळी महाग झाली.

Thali prices ease in January as onions and tomato prices decline
Rashi Peripherals IPO: राशी पेरिफेरल्सचा आयपीओ आजपासून खुला, पैसे गुंतवण्यापूर्वी जाणून घ्या तपशील

मांसाहारी थाळीच्या किंमतीत घट

पोल्ट्रीचे दर घसरल्याने मांसाहारी थाळीच्या किंमती घसरल्या आहेत. कांदा आणि टोमॅटोच्या दरात वार्षिक 35 टक्के आणि 20 टक्के वाढ झाल्यामुळे शाकाहारी थाळीच्या किंमतीत वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

या अहवालानुसार, शाकाहारी थाळीमध्ये 12 टक्के वाटा असलेल्या तांदळाच्या किंमती जानेवारी महिन्यात 14 टक्क्यांनी वाढल्या, तर नऊ टक्के असलेल्या डाळींच्या किंमती 21 टक्क्यांनी वाढल्या.

ब्रॉयलर चिकनच्या दरात घसरण

या वर्षी जानेवारीमध्ये उत्पादनात वाढ झाल्यामुळे मांसाहारी थाळीच्या किंमतीत घट झाली असून त्यामुळे ब्रॉयलर चिकनचे भाव गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 26 टक्क्यांनी घसरले आहेत.

Thali prices ease in January as onions and tomato prices decline
Indian Hotels: संख्या विक्रमी वेगाने वाढली पण रूम्स भरणार कधी? भारतीय हॉटेल उद्योगापुढे मोठा प्रश्न

डिसेंबर 2023 च्या तुलनेत जानेवारी 2024 मध्ये शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही थाळींच्या किंमती अनुक्रमे सहा टक्के आणि आठ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com