
केंद्र सरकारने पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा वाढवून आता 90 हजार रुपये केली असून मुदत 2030 पर्यंत वाढवली आहे.
छोट्या विक्रेत्यांना हे कर्ज टप्प्याटप्प्याने 15,000– 25,000– 50,000 रुपये असे दिले जाईल.
आतापर्यंत 68 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना मदत झाली असून आता 1.15 कोटी विक्रेत्यांना याचा थेट फायदा होणार आहे.
Guarantee Free Govt Loan: कोरोना काळात लाखो छोटे विक्रेते बेरोजगार झाले होते. अशावेळी त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी योजना)’ सुरू केली. या योजनेअंतर्गत गॅरंटीशिवाय कर्ज दिले जाते. आतापर्यंत या योजनेतून 80 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळत होते, मात्र आता मोदी सरकारने ही मर्यादा वाढवून 90 हजार रुपये केली असून योजनेची मुदत 2030 पर्यंत वाढवली आहे.