उत्तम गुंतवणुकीसाठी ‘पीएमएस’चे सहकार्य

‘पीएमएस’ प्लॅटफॉर्म गुंतवणूकदारांना त्यांच्या अपेक्षेनुसार पोर्टफोलिओ प्रदान करतात, यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिकरित्या व्यापार केले जाणारे रोखे, सिक्युरिटीज असतात.
portfolio management system PMS support for better investment finance
portfolio management system PMS support for better investment financeSakal

- राजेंद्र महाजनी

भारतातील उच्च संपत्ती गटातील व्यक्ती (एचएनआय) मात्र नियंत्रित जोखीम स्तरांवर उत्तम परतावा देणाऱ्या गुंतवणूक पर्यायांमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक असल्याचे दिसत आहे. त्यासाठी त्यांना पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (पीएमएस) अपेक्षित पर्यायाबाबत मार्गदर्शन करून लक्ष्यित परतावा मिळवण्याची संधी प्रदान करत आहेत.

एका अहवालानुसार, या क्षेत्राची व्यवस्थापनाखालील मालमत्ता गेल्या अर्ध्या दशकात दोन पटींहून जास्त वाढली आहे. जानेवारी २०१९ मधील १५.४० लाख कोटी रुपयांवरून ती जानेवारी २०२४ मध्ये ३२.२२ लाख कोटी रुपयांवर गेली आहे.

सखोल संशोधनानंतर पर्याय

‘पीएमएस’ प्लॅटफॉर्म गुंतवणूकदारांना त्यांच्या अपेक्षेनुसार पोर्टफोलिओ प्रदान करतात, यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिकरित्या व्यापार केले जाणारे रोखे, सिक्युरिटीज असतात. अनुभवी पोर्टफोलिओ व्यवस्थापकांद्वारे पोर्टफोलिओचे व्यवस्थापन केले जाते. बाजारपेठेला सरस ठरणारी गुंतवणूक निवडण्यासाठी ते सखोल संशोधन करतात आणि जोखीम प्रभावीपणे कमी करून जास्तीत जास्त परतावा मिळण्यास मदत करतात.

सामान्यतः, ‘पीएमएस’कडून सेवा घेण्यासाठी किमान ५० लाख रुपये गुंतवणुकीची आवश्यकता असते. गुंतवणूकदारांकडेच त्यांच्या पोर्टफोलिओमधील रोख्यांची थेट मालकी असते; तसेच त्यांच्या विवेकबुद्धीनुसार त्यांची गुंतवणूक विकण्याची (रिडीम) लवचिकता असते.

गुंतवणुकीची पद्धत

शेअर ब्रोकर कंपन्या आणि मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या ‘पीएमएस’ पर्याय गुंतवणूकदारांना उपलब्ध करतात. गुंतवणूक सुरू करण्यासाठी स्वतंत्र बँक खाते व डी-मॅट खाते सुरू करावे लागते. सर्व गुंतवणूक व्यवहार ग्राहकाच्या नावाने केले जातात.

नफा आणि लाभांश संलग्न बँक खात्यात जमा केला जातो. ही दोन्ही खाती व्यवस्थापित करण्यासाठी पोर्टफोलिओ मॅनेजरला मुखत्यारपत्र (पॉवर ऑफ ॲटर्नी) देता येते. गुंतवणुकीचे निरीक्षण करण्यासाठी गुंतवणूकदारांना पूर्ण मुभा व खुला सहभाग असतो. ‘सेबी’च्या नियमांनुसार, दर सहा महिन्यांनी गुंतवणूक कामगिरीचा अहवाल दिला जातो.

‘पीएमएस’ची चमकदार कामगिरी

एप्रिलमध्ये ‘निफ्टी ५०’ आणि ‘सेन्सेक्स’ या प्रमुख निर्देशांकांच्या एक टक्क्याच्या वाढीच्या तुलनेत, पाच आघाडीच्या ‘पीएमएस’ प्रदात्यांनी गुंतवणूकदारांना १७ ते २० टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. या क्षेत्रातील सर्वांत जुना खेळाडू म्हणजे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस.

काही उत्तम पर्यायांच्या आधारे त्याने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. गुंतवणुकीत वैविध्य, कस्टमायझेशन, पारदर्शकता, विनाविलंब संपर्क व गतिमान पोर्टफोलिओ फेरसंतुलन हे ‘पीएमएस’द्वारे मिळणारे वैविध्यपूर्ण फायदे लक्षात घेता, पुढील वर्षांमध्ये या क्षेत्रात उत्तम वाढ अपेक्षित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com