Investment: पोस्ट ऑफिसच्या 15-5-5 फॉर्म्युल्याने बना करोडपती! काय आहे ही गुंतवणूक योजना?

Post Office 15-5-5 Formula Can Help You Build 1 Crore: पोस्ट ऑफिस सारख्या सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करून तुम्ही तब्बल 1 कोटी रुपयांचा मोठा फंड तयार करू शकता. यासाठी 15-5-5 हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे कसा ते पाहा...
₹1 Crore from Post Office

Post Office 15-5-5 Formula: Invest Smartly for 25 Years and Build a ₹1 Crore Corpus!

eSakal

Updated on

How To Become Crorepati: तुम्हाला छोट्या रकमेपासून बचत सुरू करून भविष्यासाठी जर मोठा निधी तयार करायचा असेल, तर पोस्ट ऑफिसची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF योजनेचा तुम्ही विचार करू शकता. कारण चक्रवाढीचा फायदा आणि करसवलत यांच्या आधारे मोठा फंड तयार करता येतो. विशेष म्हणजे, PPF मध्ये 15-5-5 फॉर्म्युला वापरून तुम्ही गुंतवणूक 25 वर्षांपर्यंत सुरू ठेवली, तर सध्याच्या 7.1% व्याजदराच्या आधारे विचार केला तर 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी तयार होऊ शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com