

Post Office Gram Priya Scheme: Invest Monthly and Build a Safe Fund
eSakal
Post Office Gram Priya Scheme: आजच्या काळात बहुतांश लोकांना बचतीचे महत्त्व समजू लागले आहे. त्यामुळे अनेक जण सुरक्षित आणि हमखास परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. जोखीम टाळून सुरक्षित आणि स्थिर परतावा मिळवायचा असेल, तर पोस्ट ऑफिसच्या योजना हा चांगला पर्याय मानला जातो. या योजनांमध्ये गुंतवलेला पैसा सुरक्षित राहतो आणि निश्चित परतावा मिळतो. अशाच योजनांपैकी एक म्हणजे पोस्ट ऑफिसची ग्राम प्रिया योजना, जी कमी कालावधीतील मनी-बॅक स्वरूपाची विमा योजना आहे.